Anil Parab Saam TV
महाराष्ट्र

'आघाडीचे नेते ED च्या रडारवर; अनिल परबांची फाईल तयार, घोटाळे समोर येतील'

'पालकमंत्र्यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल, ED त्याचा तपास करत आहे.'

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

अमरावती : अमरावती महापालिकेच्या आयुक्तांवर शाईफेक प्रकरणानंतर रवी राणा (Ravi Rana) दिल्लीला गेले होते. यानंतर त्यांना एक आठवड्याची ट्रांझीक बेल देण्यात आली होती आणि याच सर्व प्रकरणावर बोलताना आज ते म्हणाले, 'मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्र्यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्या विरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले आणि हे सर्व मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दबावात झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. जर महाविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत असेल तर सामान्य जनतेचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मविआच्या (MVA) नेत्यांना याचा जबाब द्यावा लागेल या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. मी दिल्लीत असताना माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करतात ही माझी फसवणूक असून आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले.

अमरावतीच्या (Amaravati) पालकमंत्र्यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल, ED त्याचा तपास करत आहे असा इशाराच त्यांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे. CM आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील, त्यांच्या फाईल तयार आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Skincare Tips: दिवाळीला नॅचरल ग्लो हवा असेल, तर घरातील 'या' सामग्रीने करा फेस मसाज

Maharashtra Live News Update : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यात येणार

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT