रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु झालं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे युक्रेनबाबत फारच आक्रमक झाले आहेत. रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरु झाले आहेत. या हल्लांमध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रशियाने युक्रेनच्या पुर्वेतील सीमा-भागातील दोन गावांवर ताबा मिळवला असून रशियाकडून कारवाई सुरुच आहे. युक्रेननेही रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. युक्रेनने रशियाच्या एअर स्ट्राइकला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशियाची पाच लष्करी विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. (Russia captures two villages; Massive casualties in air strikes in Ukraine)
हे देखील पहा -
"पुतीन यांनी हल्ला केलाय, पण आम्ही पळून जाणार नाही"
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाने हल्ला केला असताना ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना आश्वासन दिलं आहे. “पुतीन यांनी हल्ला केला असला तरी कोणीही पळून जाणार नाही. लष्कर, राजकारणी प्रत्येकजण काम करत आहे. युक्रेन आपली रक्षा करणार,” असं ते म्हणाले आहेत.
''आम्ही देशाचा स्वतःचा बचाव करु आणि जिंकू''
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनीही गुरुवारी पहाटे सांगितले की ''आम्ही देशाचा स्वतःचा बचाव करु आणि जिंकू''. रशियाने युक्रेनच्या नौदल तळांवर हल्ला केला आहे. याबाबत झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनमधील शांततापूर्ण भागात बॉम्बफेक करण्याचे काम रशियाचा संघर्ष दर्शवते. युक्रेन आपल्या भूभागाचे रक्षण करेल आणि रशियन आक्रमणाचा सामना करून विजय मिळवेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्धाची घोषणा केली आहे. राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.