एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आणि आत्महत्येला अनिल परब व उद्धव ठाकरेच जबाबदार- नितेश राणे Saam Tv
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आणि आत्महत्येला अनिल परब व उद्धव ठाकरेच जबाबदार- नितेश राणे

सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला आणि 36 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

हे देखील पहा-

यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. त्या 36 कर्मचाऱ्यांची आत्महत्या नसून, ठरवून केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. अनिल परब यांना त्यांचे प्रश्न काय आहेत. हे माहीत होतं पण मातोश्रीवर चाटण्यातूनच त्यांना वेळ मिळत नाही.

वसुली वरून त्यांना वेळ मिळत नाही. 100 कोटींची वसुली करू शकतात, पण या कर्मचाऱ्यांचे पगार ते देऊ शकत नाहीत. म्हणूनच भारतीय जनता पक्ष या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज डी.लिट.ची मानद पदवी प्रदान होणार

Hair Care: ड्राय केस होतील मऊ आणि शायनी; पार्लरऐवजी घरीच तयार करा 'हा' हेअरपॅक

Home Remedies : घशातील चिकट कफ निघता निघत नाहीये? 'हे' ६ घरगुती उपाय करून पाहा

Health Tips : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप का येते? जाणून घ्या यामागची ६ सोपी कारणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, आमदार सुनील शेळके आणि RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात तुफान खडाजंगी

SCROLL FOR NEXT