अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांच्या इडी कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ  Twitter/@ANI
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांच्या इडी कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) अधिकाऱ्यांनी त्यांना न्यायलयात हजर केले होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे (Sanjiv Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांची ईडी (ED) कोठडी आज संपणार आहे. मात्र न्यायालयाने दोघांचीही इडी कोठडीत 6 जुलै पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) अधिकाऱ्यांनी त्यांना न्यायलयात हजर केले होते. कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना ईडी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. (Anil Deshmukh's personal assistant's ED custody has been extended till July 6)

काय झाले न्यायालयात?

कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीकडून ७ दिवसांची ईडी कोठडी मागण्यात आली होती. ईडीने यावर युक्तीवाद करताना संशयित आणि आरोपी यांची समोरासमोर बसून चौकशी करणं गरजेच असल्याचे म्हटले. तसेच २९ जून रोजी आरोपींचा जबाब नोंदवल्याचेही सांगण्यात आले. या जबाबात आरोपींनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा युक्तीवादही ईडीकडून करण्यात आला.

यावर ईडीने इलेक्ट्राँनिक्स पुरावे दाखवले असता, चुकून कधी तरी भेट झाली असल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. त्याच बरोबर ईडीच्या चौकशीत काही बदल्यांसंदर्भात पुरावे मिळाले आहेत. याचा तपास करणं गरजेचं आहे. हे सर्व गुन्हे संजीव पालांडे यांच्या संबधित असल्याचेही यावेळी इडीने आपल्या युक्तिवादात म्हटले. याशिवाय या प्रकरणात पैशांचा जो व्यवहार झाला. त्याची माहितीही गोळा करायची आहे. पैसे कुणाला दिले, बँक स्टेटमेंटही तपासायचे आहेत. तसेच याप्रकरणी अनेक मंत्र्यांची नावं ही समोर आली आहे. याबाबत माहिती गोळा करणे गरजेचं आल्याचे इडी ने नमूद केले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

SCROLL FOR NEXT