Anil Deshmukh received a warm welcome in Nagpur Saam TV
महाराष्ट्र

Anil Deshmukh In Nagpur: अनिल देशमुख यांचं नागपुरात जंगी स्वागत, क्रेनमधून फुलांचा वर्षाव

Anil Deshmukh Video : जामीन मिळाल्यानंतर आता तब्बल २१ महिन्यांनंतर देशमुख नागपूरमध्ये दाखल झाले आहे.

Chandrakant Jagtap

>>संजय डफ

Nagpur News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. ईडी आणि सीबीआय कुठलेही ठोस पुरावे सादर करू न शकल्याने सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर आता तब्बल २१ महिन्यांनंतर देशमुख नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यावेळी राष्ट्रवादीतर्फे त्यांची भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.

अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन येथील निवासस्थानाबाहेर देशमुक यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर क्रेनच्या साह्याने फुलांचा वर्षाव करत त्यांना फुलांचा भला मोठा हार घातला. तसेच कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांची भव्य रॅली काढण्यात आली. (Latest Marathi News)

शिवसेनेकडूनही देशमुखांचं जंगी स्वागत

या रॅलीदरम्यान व्हेरायटी चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही अनिल देशमुख यांचं स्वागत करत त्यांना भगवी शॉल दिली. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांचे फोटो असलेले 'वारसा संघर्षाचा' असे पोस्टर्स हातात घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी

अनिल देशमुख २१ महिन्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वगृही परतले आहेत. त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यानी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. ढोल आणि फलक घेऊन कार्यकर्ते विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणांहून नागपूर विमानतळावर दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना बायकोनं पकडलं; झिपऱ्या धरून नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात लय बेकार चोपलं

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT