Anil Deshmukh vs Devendra Fadnavis : सचिन वाझेंच्या गंभीर आरोपाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलेय. वाझेंचे (sachin waze) आरोप फेटाळून लावताना देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. वाझेच्या कुबड्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) माझ्यावर आरोप करत असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटलेय. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासनाकडे सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.
माझ्यावरील 3 वर्षापुर्वी परमवीर सिंग व सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी ११ महीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान दहशतवादी व दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्ट पणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीए.ने मला पैसे मागीतले नाहीत आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाहीत. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली, असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
दहशवादी व दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच 3 वर्षापुर्वीचा आरोप करीत आहे. काल सांगीतल्याप्रमाणे मला जामीन देताना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगीतले की, सचिन वाझे हा 2 खुनाच्या गुन्हाच्या आरोपात असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात माझ्या वकीलांनी जेव्हा त्याची उलट चौकशी केली. तेव्हा त्याने स्पष्ट सांगीतले की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीए ने व कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैसे मागीतले नाही किंवा मी दिले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासना सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे 2 वर्षापुर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षांपासून तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणीत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन न्यायमुर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनीक करण्यासाठी विनंती केली. दोन वर्षापूर्वी हा अहवाल राज्य शासनाला सादर झाला त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रामध्ये अनिल देशमुख यांना न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या अहवालात "क्लीन चिट दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या अहवालात मला "क्लिन चिट" दिल्यामुळे तो देवेंद्र फडणवीस यांनी दडवून ठेवला आहे, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.