Anil Deshmukh Saam Tv news
महाराष्ट्र

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका; कन्या आणि सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

Anil Deshmukh: सीबीआयने (CBI) सोमवारी पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये पूजा आणि राहत यांच्यासह अनिल देशमुख यांचे दूरचे नातेवाईक यांचाही नावाचा समावेष असल्याची चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

पराग ढोबळे

Political News:

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पुन्हा एक मोठी बातमी समोर आलीये. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या क्लीनचीट अहवालाची माहित लीक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांची कन्या आणि सुनेवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीबीआयने क्लीनचिटच्या अहवाला संदर्भात अभिषेक तिवारी आनंद डागा यांना अटक केली होती. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने (CBI) सोमवारी पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये पूजा आणि राहत यांच्यासह अनिल देशमुख यांचे दूरचे नातेवाईक यांचाही नावाचा समावेष असल्याची चर्चा आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयने चौकशी केली होती. त्याच प्रकरणात क्लीन चिट अहवाल हा लीक झाला होता. सीबीआय रिपोर्ट लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्यावर चार्जशीटमध्ये पुरवणी आरोपपत्रात उल्लेख केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचा अंतर्गत अहवाल हा ऑगस्ट 2021 मध्ये प्रसार माध्यमांमध्ये लीक झाला होता. तो अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती.

यात सोमवारी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. अनिल देशमुख यांनी मुलगी पूजा( विवाहित असून पुण्यात राहत असल्याची माहिती) आणि सून राहत (मुलगा ऋषीची पत्नी) यांनी अभिषेख तिवारीकडून अहवाल घेत तो अहवाल लीक करून त्याचे व्हिडीओ काढल्याचा आरोपात उल्लेख आहे. सोशल माध्यमांवर सुद्धा हा अहवाल टाकण्यात आला होता. यासह अनिल देशमुख यांचे अन्य दोन नातेवाईक यांचाही यात समावेश असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Ladki Bahin Yojana: ₹३००० की ₹४५००, लाडकीच्या खात्यात किती रूपये येणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mahapalika Elections : भाजप म्हणतंय पाठीत खंजीर खुपसला, शिवसैनिक म्हणाला स्वबळावर होऊन जाऊ द्या, कल्याणमध्ये नेमकं काय सुरू?

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

SCROLL FOR NEXT