Anil Deshmukh  Saam tv
महाराष्ट्र

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Anil Deshmukh Latest News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा असल्याचा अहवाल पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आलाय. या अहवालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला नव्हता, असा पोलीस अहवाल कोर्टात सादर

नागपुरात प्रचारादरम्यान दगडफेक झाल्याचा दावा करण्यात आला होता.

पोलिस तपासात एफआयआरमधील घटनाक्रम खोटा, सूत्रांची माहिती

अहवालामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील झालेल्या हल्ल्यातील घटनाक्रम झाला नसल्याचा अहवाल नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या अहवालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांच्यावर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचारादरम्यान हल्ला झाला होता. नागपूरहून परत येत असताना त्यांच्या वाहनावर दगड फेकून हल्ला झाल्याची तक्रार देण्यात आली होती. या घटनेचा अहवाल पाठवताना पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये हा एफआयआरमध्ये दिलेला घटनाक्रम झाला नसल्याचं असा दावा करण्यात आलाय.

त्यानंतर पोलिसांनी तपास करत नागपूर ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यांच्या माध्यमातून तो अपघात कसा झाला होता असा रिपोर्टही तयार केला होता.

अनिल देशमुख यांना त्यावेळी नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं. तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी यांची दोन दिवसांपूर्वीच बदली झाली होती. त्यांनीच हा अहवाल कोर्टात सादर केल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती पुढे येत आहे.

या अहवालामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही या प्रकरणावर निशाणा साधायला सुरुवात केलीये. मात्र, देशमुख यांच्या समर्थकांकडून या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणावर अद्याप माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या प्रकरणावर अनिल देशमुख काय प्रतिक्रिया देतील, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Cheese Ball Recipe : मुलांच्या टिफिनसाठी बनवा खुसखुशीत कोथिंबीर चीज बॉल, वाचा रेसिपी

Veg Crispy Recipe: हॉटेलसारखी 'व्हेज क्रिस्पी' आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Maharashtra Government : १५ जानेवारीला राज्यात सरकारी भरपगारी सुट्टी, शाळाही राहणार बंद, कारण काय ?

Don 3: रणवीर सिंहच्या एक्झिटनंतर 'या' अभिनेत्याचं नशीब उजळणार; फरहान अख्तरच्या 'डॉन ३'मध्ये करणार धमाकेदार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT