विविध मागण्यांच्या पू्र्ततेसाठी हजारो अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Sevika) आज (मंगळवार) वैजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. दरम्यान मागणी मान्य झाल्यास हिवाळी अधिवेशन काळात तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra News)
राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करण्यात यावा. त्याचबरोबर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी यासारख्या आदी मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी साेमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. अंगणवाडी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या वैजापूर तहसील कार्यालयावर आयटक संघटनेच्या वतीने हजारो अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा काढला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एकात्मिक महिला आणि बालविकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी ,निवृत्त पेन्शन देण्यात यावे यासारख्या विविध मागण्या घेऊन हजारो अंगणवाडी सेविका वैजापूर तहसील कार्यालयावर धडकल्या.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.