anganwadi sevika andolan in nandurbar saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Sevika Andolan : दिवाळीपूर्वी भाऊबीज द्या; नंदुरबार जिल्हा परिषेदवर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या

अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज द्यावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. याबराेबरच पोषण आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य उपलब्ध करून द्यावेत या व आदी मागणीसाठी आज हजारो अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. (Maharashtra News)

राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी भाऊबीज देण्याची घोषणा केली मात्र दिवाळी जवळ आली असली तरी अंगणवाडी सेविकांना अजूनही भाऊबीज मिळालेली नाही. त्यासोबत राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडींना विविध पोषणाचे साहित्य पुरवले जाते मात्र पोषण आहार सुजवण्यासाठी गॅस आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिला जात नाही.

त्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोठी कसरत करावी लागते. राज्यभरात अंगणवाडीचा वेळ सकाळी साडेसात पासून तर साडेबारा वाजेपर्यंत आहे. मात्र नंदुरबार जिल्हा परिषदेने निर्णय घेता अंगणवाडीची वेळ नऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत केला असल्याने अंगणवाडी सेविकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगणवाडीचा वेळ बदलण्यात यावा त्यासोबत त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आजपासून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर नंदुरबार जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT