andolan for independent vidarbha state from 20 december declares wamnrao chatap saam tv
महाराष्ट्र

MOVEMENT FOR INDEPENDENT VIDARBHA STATE: 'वेगळ्या विदर्भासाठी 'करू किंवा मरू..!'

येत्या २० डिसेंबरपासून आंदाेलन छेडण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली.

संजय जाधव

Buldhana News :

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या (independent vidarbha state) मागणीसाठी सातत्याने चळवळ करणारे माजी आमदार वामनराव चटप (wamanrao chatap) यांनी बुलढाण्यात घोषणावजा निर्धार बोलून दाखविला. '३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करू वा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच' अशी गर्जना त्यांनी येथे केली. तसेच चटप यांनी २७ डिसेंबर पासून विदर्भव्यापी आंदोलनाची घोषणा देखील केली. (Maharashtra News)

शासकीय विश्रामगृहात् जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना चटप म्हणाले अकोला जिल्ह्यात २० डिसेंबरला पश्चिम विदर्भ स्तरीय 'विदर्भ निर्माण संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा मेळावा असेल.

उपोषण आणि रस्ता रोको आंदोलन

त्यानंतर २७ तारखेपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, ऍड वीरेंद्र जैस्वाल यांचेसह विदर्भातील प्रमुख सहकारी सहभागी होणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुलढाण्यात राम बारोटे, तेजराव मुंडे, सुरेश वानखेडे, दामोदर शर्मा, कैलास फाटे ,प्रकाश अवसरमोल हे उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला पाठींबा म्हणून विदर्भातील ११ जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे चटप यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या

केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, विदर्भात येऊ घातलेले २ औष्णिक प्रकल्प विदर्भा बाहेर न्यावे, वीज दरवाढ व कृषी पंपा साठी असलेले दिवसाचे लोडशेडिंग रद्द करावे आदी १० मागण्यासाठी हे विदर्भ व्यापी आंदोलन असणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT