Andhra Pradesh Accident Saam TV
महाराष्ट्र

Andhra Pradesh Accident: अनियंत्रित बसने तिघांना चिरडलं; आंध्र प्रदेशातील थरारक अपघाताचे CCTV फुटेज आले समोर

Andhra Pradesh Accident News : वाहनचालक बस मागे घेत असतो. मात्र त्याचं नियंत्रण सुटतं आणि बस पुढे चालू लागते. आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

Andhra Pradesh News:

आंध्र प्रदेशमध्ये अपघाताची एक थरारक घटना घडली आहे. विजयवाडा येथे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट बसस्थानकातील वेटींग एरीयामध्ये शिरली. यामध्ये बसने तिघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विजयवाडा येथील पंडित नेहरू या बस स्थानकात ही घटना घडलीये. अपघाताचा थरार बसस्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस पार्किंग लॉटमध्ये उभी आहे. येथे असताना वाहन चालक बसमागे घेत असतो मात्र त्याचं नियंत्रण सुटतं आणि बस पुढे चालू लागते.

बस स्थानकात असं काही घडेल याची कुणाला काहीच कल्पना नसते. वेटींगसाठी काही माणसं येथे असलेल्या बाकांवर बसलेली असतात. ही बस थेट त्यांना धडकते. या धडकेत तीन जण चाकाखाली चिरडले जातात. हा अपघात इतका क्षणात होतो की, काय करावं? कुणाला कसं वाचवावं याबद्दल कुणालाच काहीच समजत नाही.

मृत्यू कधी आणि कसा ओढावेल याचा काही नेम नसतो. झालेल्या अपघातानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर चांगले वैद्यकीय उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Signs Astro Tips: 'या' राशींच्या व्यक्ती असतात फार तापट स्वभावाच्या; पाहा तुमची रास यात आहे का?

Maharashtra Rain Live News: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT