Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : अंदर मावळातील रस्ते खड्डेमय; खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून ग्रामस्थांचे आंदोलन

Maval News : मावळच्या टाकवे ते राजापुरी दरम्यानचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. तर २०१६ मध्ये हा रस्ता तयार केला

दिलीप कांबळे

मावळ : अंदर मावळ मध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून या खड्ड्यांमध्ये गुडघ्यावर पाणी साचले आहे. या खड्ड्यातून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असते. या सर्व परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी आज रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन केले आहे. 

मावळच्या टाकवे ते राजापुरी दरम्यानचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. तर २०१६ मध्ये हा रस्ता तयार केला; तेव्हापासून आतापर्यंत कधीही या रोडची दुरुस्ती केली गेली नाही. या रस्त्याचं डांबरीकरण करून १८ फुटी रस्ता करावा; अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

मोठ्या खड्ड्यांमुळे त्रास 

पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक गंभीर घटना याआधी घडल्या आहेत. रस्त्याची दुरावस्था केवळ वाहन चालकापुरतीच मर्यादित नसून शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण आणि गर्भवती महिलांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ही समस्या असून देखील प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलून रस्ता दुरुस्त करत नाही.

खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन 

दरम्यान प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी अनोख्या पद्धतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करत लक्ष वेधले आहे. या रस्त्यावर एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल देखील नागरिक विचारत आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल; असा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT