लातूर: जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात मोठ्या प्रमाणात होत असलेली देशी-विदेशी दारू, सटका, मटका, गांजा यांची खुलेआमपणे विक्री होत आहे. त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये महिलांनी डोक्यावर टोपलीमध्ये कोंबड्या आणि देशी दारूच्या बाटल्या घेऊन ठाण्यावर धडकल्या. (... and the police were greeted on the first day with alcohol-chicken?)
हे देखील पहा -
आज प्रथमच भादा पोलीस स्टेशन येथे विलास नवले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतले आणि त्यांचे स्वागत या मोर्चाच्या आक्रोश आणि संतापाने झाले. या मोर्चाप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केलेले निवेदन यावरून आपण 45 गावात सर्व अवैध धंदे कोण व कशा पद्धतीने चालवत आहे त्यांचा तात्काळ आढावा घेणार आहोत. सोबतच अशा सर्व व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी पोलिसांची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचा अभिवचन त्यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना दिले.
तर दुसरीकडे या गावातील कोणत्याही महिलांना अवैध धंदामुळे किंवा कुटुंबातील मद्यपी कडून त्रास होत असल्यास तात्काळ मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले यावर पोलीस तात्काळ कार्यवाही करण्याचे वचन देखील नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी दिला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.