साडे चार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा! अॅड.जयेश गावांडे
महाराष्ट्र

साडे चार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा!

मुलाला चॉकलेटचे आमिष देऊन घरात बोलावले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील माना पोलिस स्टेशनच्या (Mana Police Station) हद्दीतील गावामध्ये साडेचार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय आजोबाला पोस्कोच्या विशेष न्यायालयाने (POSCO's Special Court) आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच अडीच लाख रुपये दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. ही घटना माना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 24 जुलै 2019 रोजी घडली होती. (An old man who abused a little boy was sentenced to life imprisonment)

हे दखील पहा -

विठ्ठल मारुती पारिसे (75) असे आरोपीचे नाव आहे. माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावामध्ये एक चार वर्षाचा मुलगा हा घराबाहेर खेळत होता. त्याच्या शेजारी राहणारा विठ्ठल मारुती पारीसे याने त्या मुलाला चॉकलेटचे आमिष देऊन घरात बोलावले. त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याच वेळी तेथे वर्गणी मागण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी घरात कोणी आहे का, यासाठी आवाज दिला. घरातून उत्तर येत नसल्यामुळे त्या महिलांनी दरवाजा लोटून आत डोकावून पाहिले. त्या महिलांना विठ्ठल पारिसे हा त्या मुलावर अत्याचार करीत असल्याचे त्यांना दिसले. या दोन महिलांना पाहून पीडित बालक हा रडत घरी पळत गेला. तसेच त्या दोन महिलांनी पण त्या पीडित बालकाच्या आईला संबंधित घटना सांगितली.

पीडित मुलाचे वडील रात्री घरी आल्यानंतर त्यांनी 25 जुलै 2019 रोजी माना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये भादंवी कमल 377, पोस्को 3, 4, 5, आणि कलम 7,8,9 नुसार गुन्हा दाखल केला. माना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector Police) संजय खंडारे आणि पोलिस उपनिरीक्षक विजय महाले यांनी यामध्ये तपास केला. यामध्ये विठ्ठल पारिसे यास अटक केली आहे. तेव्हापासून तो कारागृहात (in jail) होता.

या प्रकरणी पोस्कोच्या विशेष न्यायालयमध्ये प्रकरण सुरू होते. न्यायालयाने यामध्ये आठ साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. विशेष न्यायालयाने कलम 377 मध्ये जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड तसेच पोस्को 3, 4, 5 मध्ये जन्मठेप व एक लाख रुपये दंड तसेच कलम 7, 8, 9 मध्ये पाच वर्षे शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडातील अर्धी रक्कम ही पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ऍड. मंगला पांडे यांनी युक्तिवाद केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT