जरांगे पाटलांच्या आंदोलनाला 13 दिवस उलटल्य़ानंतरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला तोडगा काढता आलेला नाही... अशातच जरांगेंनी मुंबईत निर्णायक आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय...त्यातच , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलयं...अमृता फडणवीस काय म्हणाल्या ऐकूय़ात...
अमृता फडणवीसांनी जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर जरांगेंनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय.. ताईंनी लढाईत जेवायला बोलवू नये, मात्र भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन जेवायला घरी येतो, असा टोला जरांगे पाटलांनी लगावलाय... दुसरीकडे जरांगेंसोबत जेवण, नाष्टा करायला आम्ही तयार आहोत. पण ते आम्हाला शिव्या घालतात, अशी खोचक टीका प्रताप सरनाईक यांनी केलीय...
जरांगेंनी आधीच सरकराला 12 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिलाय. .... त्यानंतर मुंबईतील आंदोलनासाठी मराठ्यांना सज्ज राहायला त्यांनी सांगितलयं...अमृता फडणवीसांचं निमंत्रण जरांगेंनी स्वीकारलंय. मात्र जेवायला साडीचोळी घेऊन भाऊबीजेला जाणार असल्याचं सांगून जरांगेंनी आताची वर्षावरची वारी ही मराठा आरक्षणासाठीच असल्य़ाचं सांगून संघर्षाची भूमिका कायम ठेवलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.