गणपतीत येणार अमृता वहिनींचे नवीन गाणे !  Saam Tv
महाराष्ट्र

गणपतीत येणार अमृता वहिनींचे नवीन गाणे !

अमृता फडणवीस यांनी येणाऱ्या गणेशोत्सवात आपले नवीन गाणे येणार असल्याची घोषणा अमृता फडणवीस यांनी आज केली. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

अश्विनी जाधव, सागर आव्हाड,सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis कायमच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात आपले नवीन गाणे येणार असल्याची घोषणा अमृता फडणवीस यांनी आज केली. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

सध्या कोरोनाची Corona दुसरी लाट आटोक्यात येत आहे. या पार्श्ववभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून निर्बंधांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. २५ जिल्ह्यांत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्याचबरोबर ११ जिल्ह्यात निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले. या ११ जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरात लेव्हल ३ चे निर्बंध लागू आहेत. यावरून पुण्याचे व्यापारी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे.

हे देखील पहा-

पुण्याला एक न्याय आणि मुंबईला एक न्याय का?

याच मुद्यावरून पुण्याला एक न्याय आणि मुंबईला एक न्याय का असा सवाल अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला. अशा अनेक मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी पुणेकरांशी आज संवाद साधला. यावेळी अमृता पुणेकरांना सरकारच्या या निर्णयाविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच येत्या गणेशोत्सवाच्या आधी आपले नवीन गाणे येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

अमृता फडणवीस यांनी पुण्याच्या धागा हॅन्डलूम महोत्सवात उपस्थिती लावली होती. अमृता फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुणेकरांशी संवाद साधत असताना त्या म्हणाल्या, ‘कोरोना काळातील सर्व नियमांच पालन करून सर्वांनी शॉपिंग करा. मुंबईसह इतर जिल्ह्यात नियम काही प्रमाणत शिथिल झाले आहेत. मात्र पुण्यात का झाले नाहीत? पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या फक्त ४ टक्के असतानाही नियम शिथिल का झाले नाहीत?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

काम एकजण करतो आणि हार दुसरे घालून जातात;

पुणे मेट्रो ट्रायलच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण नव्हते. या मुद्द्यावर अमृता फडणवीसांना विचारले असता, त्या म्हणाल्या,' फडणवीसांच्या काळात मेट्रोला परवानगी मिळाली आणि खऱ्या अर्थाने काम सुरु झाले. त्यामुळे काम एकजण करतो आणि हार दुसरे घालून जातात असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Family Relations: घरी आलेल्या नातेवाईकांसमोर 'या' 4 चुका टाळा, घरचे वातावरण राहील आनंदी

HBD Dhanush : धनुषचा बॉलिवूडचा पहिलाच चित्रपट सुपरहिट, टॉप अभिनेत्रीसोबत रोमान्स

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडकीला मिळतात फक्त ५०० रुपये; बहि‍णींचे ₹१००० का कापले?

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

SCROLL FOR NEXT