Voter List Name Missing: saam tv
महाराष्ट्र

Voter List : अजब कारभार चव्हाट्यावर! नाव, पत्ता नव्हे अनेक गावं मतदार यादीतून गायब, अमरावतीत खळबळ

Voter List in Amravati : अमरावती जिल्ह्यातील अनेक गावं मतदार यादीतून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बच्चू कडूंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा दिला आहे.

Namdeo Kumbhar

Amravati villages missing from voter list before Zilla Parishad elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची धुरळा काही दिवसातच उडणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची तयारी करण्यात येतेय. पण अमरावतीमधील गाही गावं मतदार यादीतून गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अमरावती जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीआधी आयोगाकडून प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे गहाळ झाल्याचे समोर आले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पूर्वसंध्येलाच निवडणूक विभागाचा हा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक पूर्वी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अख्खे गावे गायब झाल्याचा आरोप माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांकडे तक्रार केली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली.

बच्चू कडूंचा संताप, काय म्हणाले?

आधी मतदार यादींमधील नाव गायब होत होते, आता गाव गायब होत आहे. ही निवडणूक आयोगाची मोठी गंभीर चूक आहे. लोकशाहीला अशा प्रकारे जर छेडल्या जात असेल आणि अधिकारी अशा प्रकारे वागत असेल तर उद्या मतदार नावाची गोष्ट संपली तर राजेशाही सुरू होईल. लोकशाहीतून जो हुकूमशहा चालवण्याचा प्रकार आहे, याचा मी निषेध करतो, याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

कोणती नावे मतदार यादीतून गहाळ ?

सुर्जी तालुक्यातील गट क्रमांक १० कापूसतळणी, ११ भंडारज, १२ सातेगाव असे तीन गट, त्याशिवाय गण क्रमांक १८ खानमपूर पांढरी, गण क्रमांक २० कापूसतळणी, २१ चौसाळा, २२ भंडारज, २३ सातेगाव व २४ कोक अशा सहा गणांच्या यादीमध्ये खानमपूर पांढरी गणामधील टाकरखेडा मोरे, कापूसतळणी गणामधील अहमदपूर (टाकरखेडा मोरे), रौंदळपूर (कापूसतळणी), पोही, रत्नापूर (पोही), जवळा बु. जवळा खुर्द, औरंगपूर (कसबेगव्हाण), सैदापूर (कसबेगव्हाण), तर चौसाळा गणामधील डोंगरगाव (तुरखेड) व भंडारज गणामधील मलकापूर बु, अडगाव खाडे, नवापूर (अडगाव खाडे), मासमापूर (अडगाव खाडे), मूर्तिजापूर घोगर्दा (अडगाव खाडे), हसनापूर पार्टी, शिरजगाव (हसनापूर पार्टी), कारला, निमखेड आडे (कारला), जवडी, धुडकी गावांची नावे यादीत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शरद पवारांच्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

हेल्मेटच्या विविध रंगामध्ये लपलंय खास सिक्रेट; वाचा कोणत्या रंगाचा काय अर्थ?

SCROLL FOR NEXT