Police investigate the tragic suicide case of a married woman in Paratwada, Amravati, following allegations of harassment by in-laws for not bearing a son. saam tv
महाराष्ट्र

मुलगा नाही म्हणून अमानुष छळ; अखेर विवाहित महिलेने संपवली जीवनयात्रा, नवरा-सासऱ्याला अटक

Woman Suicide Due To Harassment For Not Having Son In Amravati: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे दोन मुली झाल्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

मिळालेली माहितीनुसार, साजिदा आफरीन असे आत्महत्या करणाऱ्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. साजिदा यांना दोन मुली होत्या. मात्र मुलगा झाला नाही या कारणावरून सासरच्या मंडळीकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर साजिदा यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अचलपुर पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने हालचाली करून साजिदा यांचा नवरा आणि सासरा या दोघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अहिल्यानगरमध्ये २३ वर्षीय विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

हुंड्यासाठी सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून एका २३ वर्षांच्या विवाहितेने विहिरीत उडी मारत जीवनयात्रा संपवली. राहाता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली. प्रिया शुभम ढगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुखी संसार करण्याच्या स्वप्नांनी सासरी गेलेल्या प्रियाचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायक ठरला. घर बांधण्यासाठी माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरकडून प्रियाचा सतत छळ केला जात होता. प्रियाचा नवरा शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे हे तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. इतकंच नाही, तर अनेकदा तिला उपाशीपोटीही ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२०२४ पासून सुरू असलेला हा छळ दिवसेंदिवस असह्य होत गेला. अखेर या सगळ्याला कंटाळून प्रियाने टोकाचं पाऊल उचलत विहिरीत उडी घेतली. प्रियाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळळा. या घटनेनंतर एकरुखे गावात शोककळा पसरली असून परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा नवरा, सासरा आणि सासू या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट झाला. हुंड्याच्या लालसेपायी अजून किती जीव जाणार? हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

थकवा झटक्यात निघून जाईल! शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी सकाळी प्या 'ही' नॅचरल टी

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोन; नंतर फडणवीसांनी बीएमसीमधील शिंदे गटाच्या प्लॅनला लावला ब्रेक

Maharashtra News Live Update: अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

PMC Recruitment : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! नियुक्तीपत्रांवर असणार QR कोड, बनावट भरतीला बसणार आळा

Pune : पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT