Sanjay Raut- Navneet Rana Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: नवनीत राणांवरील टीका संजय राऊतांना भोवणार? महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

Sanjay Raut on Navneet Rana: अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Sanjay Raut criticizes Navneet Rana

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. कारण, युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील  (Lok Sabha Election 2024 महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १८) अमरावती येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार संजय राऊत यांची उपस्थिती होती.

या मेळाव्यात बोलताना, "ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे." असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं.

"ज्‍या बाईने हिंदुत्‍वाविषयी अपशब्‍द वापरले, मातोश्रीला आव्‍हान देण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्‍य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असलं पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा", असंही राऊत म्हणाले होते.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राऊतांविरोधात गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT