Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील ८ तालुक्यातील पाणी नमुने दूषित; २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

Amravati News : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात याचा परिणाम अधिक जाणवत असून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: वाढत्या तापमानासोबतच सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अमरावती जिल्ह्यात देखील काही ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यात आता अमरावती जिल्ह्यातील ८ तालुक्यात पाण्याचे नमुने दूषित आढळून आले असून २५ ठिकाणचे पाणी हे पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. 

राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात याचा परिणाम अधिक जाणवत असून टँकरद्वारे (Water Supply) पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान गावात पाण्याचे स्रोत आहेत, त्या पाण्याचे नमुने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी घेतले जातात. यात (Amravati) अमरावती जिल्ह्यातील ८ तालुक्यात पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. 

आरोग्य विभागाकडून १४ तालुक्यात १४९१ ठिकाणचे पाणी नमुने तपासासाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील २५ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळल्याने (Zilha Parishad) जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना काही ठिकाणी जलस्त्रोतांचे पाणी नमुने दूषित आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत कुठेही सात रोगाचा प्रादुर्भाव नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

SCROLL FOR NEXT