Dosa Recipe : मुलं दुधी भोपळा खात नाहीत? मग 'असा' बनवा कुरकुरीत डोसा, एकदा चव चाखताच पुन्हा पुन्हा मागतील

Shreya Maskar

हेल्दी नाश्ता

तुमची मुलं जर दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तर खास चटपटीत दुधी भोपळ्याचा डोसा बनवा. पावसाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

Healthy Breakfast | pinterest

दुधी भोपळ्याचा डोसा

दुधी भोपळ्याचा डोसा बनवण्यासाठी चिरलेला दुधी भोपळा, रवा , कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या, दही , पाणी ,काळी मिरी पूड, मीठ, खाण्याचा सोडा, तूप किंवा तेल आणि चीज इत्यादी साहित्य लागते.

Bottle Gourd Dosa | pinterest

दुधी

दुधी भोपळ्याचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढा, नंतर त्याचे लहान तुकडे करा म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Bottle Gourd | pinterest

रवा

आता दुधी भोपळ्याचे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात बारीक रवा मिक्स करा. दुधी भोपळा आणि रव्यामध्ये थोडी ताजी कोथिंबीर, आल्याचा एक तुकडा, ताज्या हिरव्या मिरच्या आणि थोडे दही घालून मिश्रण पुन्हा वाटून घ्या. डोशासाठी गुळगुळीत पीठ तयार करा. आता तयार पीठ एका मोठ्या भांड्यात काढून मिक्स करा.

Semolina | pinterest

मीठ

डोशाच्या पीठात काळी मिरी पूड, मीठ आणि इतर मसाले घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर चिमूटभर बेकिंग सोडा आणि थोडे पाणी घाला. पीठ मध्यम घट्ट असावे, खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे.

Salt | pinterest

डोशाचे पीठ

गॅसवर एक नॉन-स्टिक पॅन ठेवा. पॅन मध्यम गरम झाल्यावर, त्यावर डोशाचे पीठ घाला आणि चमच्याने एकसारखे पसरवा.

dosa | pinterest

तूप

डोसा एका बाजूने शिजायला लागताच, त्यावर थोडे तूप किंवा तेल घाला आणि त्याला थोडे कुरकुरीत होऊ द्या. लक्षात ठेवा, डोसा फक्त एकाच बाजूने शिजतो, म्हणून चिल्याप्रमाणे त्याला उलटवू नका.

Ghee | pinterest

चवीसाठी टीप

तुम्ही डोशामध्ये थोडे चीज देखील घालू शकता. चीज वितळल्यावर ते दुमडून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

dosa | pinterest

NEXT : ना मावा, ना मिल्क पावडर; १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट पेढे, तोंडात टाकताच विरघळतील

Peda Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...