Shreya Maskar
श्रावणात उपवासाला देवाला नैवद्य दाखवण्यासाठी घरीच १० मिनिटांत मस्त पेढे बनवा. तुम्ही मावा आणि मिल्क पावडरचा वापर न करताही मऊ, चविला स्वादिष्ट पेढे बनवू शकता.
पेढे बनवण्यासाठी पनीर, काजू, दूध, साखर, दूध, तूप, केशरी खाण्याचा रंग, वेलची पूड आणि सजावटीसाठी सुका मेवा इत्यादी साहित्य लागते.
पेढे बनवण्यासाठी प्रथम ताजे पनीर लहान तुकड्यांमध्ये कापा किंवा किसून घ्या. मिक्सरच्या भांड्यात मोठे चमचे थंड दूध आणि मूठभर काजू घालून गुळगुळीत पेस्ट बनवा.
पनीरचे मोठे तुकडे करू नका, कारण ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होणार नाही. गुळगुळीत पेस्टसाठी ते किसणे उत्तम.
एका पॅनमध्ये साखर घालून मंद ते मध्यम आचेवर पूर्णपणे विरघळू द्या. यावेळी साखरेत पाणी घालण्याची गरज नाही, फक्त ढवळत साखर कॅरमेलाइझ करायची आहे.
साखर पूर्णपणे विरघळल्यावर दूध घालून चांगले मिसळा. त्यानंतर, पनीर आणि काजूची पेस्ट घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
चवीसाठी वेलची पूड घालू शकता. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे पेढे बनवा. सजावटीसाठी पेढ्यावर काजू, बदाम आणि पिस्ता यांचे काप लावा. पेढे १ तास फ्रिजमध्ये सेट होऊ द्या.