Shreya Maskar
श्रावण महिन्यात सोमवारी उपवास केला जातो. उपवासाला तेच तेच साबुदाण्याचे वडे, खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर यंदा साबुदाण्याचा चिला एकदा ट्राय कराच.
साबुदाणा चिला बनवण्यासाठी साबुदाणा, उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याची पूड, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, काळी मिरी पूड, जिरे, सैंधव मीठ आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
साबुदाणा चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम एक मोठे बाउलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात साबुदाणा टाकून २ मिनिटे ठेवून द्या. जर तुम्ही रात्री साबुदाणा भिजवायला विसरला असाल तर ही ट्रिक वापरा.
त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये गरम पाण्यातील साबुदाणा काढा त्यात उकडलेले मॅश केलेले बटाटे घाला. मिश्रणात जाडसर वाटलेले शेंगदाणे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, काळी मिरी पूड आणि चवीनुसार सैंधव मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
तयार मिश्रण चांगले एकजीव करून मळून घ्या, जोपर्यंत त्याचा मऊ गोळा तयार होत नाही. लक्षात ठेवा, त्यात पाणी घालू नका.
आता गॅसवर एक नॉन-स्टिक पॅन ठेवा आणि त्याला थोडे तूप घाला. त्यानंतर एक एक करून साबुदाण्याच्या मिश्रणाचे छोटे चिला टाकून दोन्ही बाजूंनी परतून घ्या.
लक्षात ठेवा चिला खरपूस भाजताना गॅस कमी आचेवर ठेवा. अशाप्रकारे फक्त ५-१० मिनिटांत चटपटीत आणि कुरकुरीत साबुदाणा चिला तयार झाला आहे.
गरमागरम साबुदाणा चिल्याचा शेंगदाण्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. याने तुमचे पोट नक्कीच भरेल.