Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : पाणी टंचाईचे संकट; अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठा ४६ टक्क्यावर

Amravati News : पावसाळ्यात झालेल्या संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात ५६ प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली होती. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बाष्पीभवनामुळे जलसाठा कमी होत चालला आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : यंदाच्या उन्हाळ्यात देखील गतवर्षी प्रमाणे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. काही भागात याची सुरवात झाली असून अमरावती जिल्ह्यात देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणी पातळीमध्ये घट होत असून जिल्ह्यातील ५६ प्रकल्पामधील जलसाठा ४६ टक्क्यावर आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे. 

पावसाळ्यात झालेल्या संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात ५६ प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने व होत असलेल्या बाष्पीभवनामुळे हा जलसाठा कमी होत चालला आहे. अमरावती जिल्ह्यातील ५६ प्रकल्पांमध्ये हा जलसाठा आता ४६ टक्क्यावर येऊन ठेपला आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये हा जलसाठा चार टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाईची शक्यता अमरावती जिल्ह्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भंडाऱ्यात पाण्याची पातळी खोल गेल्याने धान करपण्याच्या मार्गावर
भंडारा
: भंडाऱ्यात नदीच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने धान करपण्याच्या मार्गावर आले आहे. यामुळे राजीव सागर धरणातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरातील बावनथडीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये बहुतेक जमिनीवर उन्हळी भात आणि ऊसाची लागवड करण्यात आली आहे. जिथे पुनर्लागवड झाली आहे तिथेही पाण्याअभावी भाताचे पीक सुकू लागले आहे. 

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत 

यावर्षी मार्च महिन्यातच पिकांच्या सिंचनाची चिंता शेतकऱ्यांना आहे. भात पिकाला पाण्याची गरज आहे. नदीची पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरींमध्ये पुरेसे पाणी साठवले जात नाही. जल जीवन मिशनच्या विहिरी देखील पुरेसे पाणी साठवू शकत नाहीत. त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होत आहे. बावनथडी, राजीव सागर सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT