Philippines Plane Crash Saamtv
महाराष्ट्र

Philippines Plane Crash: पायलट होण्याचे स्वप्न अपूर्णच... फिलीपाईन्समध्ये भीषण विमान अपघात; अमरावतीच्या तरुणाचा मृत्यू

Amravati News: फिलिपाइन्समध्ये एक लहान विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात अमरावतीच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी...

Amravati News: फिलिपाइन्समध्ये एक लहान विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात अमरावतीच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. अंशुम कोडे असे या तरुणाचे नाव असून तो चार महिन्यांपूर्वी वैमानिक बनण्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी फिलिफाईन्स देशात गेला होता. या दुर्देवी घटनेने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२:१६ च्या सुमारास इको एअर सेसना १५२ या विमानाने लाओग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. यानंतर त्याचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले.

दुपारी ३:१६ च्या सुमारास तुगेगराव विमानतळावर हे विमान पोहोचणार होते. मात्र, शोध पथकाला काल दुपारी अपायाओ प्रांतात या विमानाचे अवशेष सापडले. या दुर्देवी घटनेत अंशुम (Anshum Kode) कोडे याच्यासह आणखी एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अंशुम कोडेचे पार्थिव एअर ॲम्बुलन्सने भारतात आणण्यात येणार आहे. वैमानिक बनण्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी अंशुम कोंडे फिलीपिन्स देशात गेला होता. परंतु या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने अमरावती (Amravati) जिह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT