Amravati crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati crime : माजी नगरसेविकेच्या घरात दरोडा; २२७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास, परिवार शाहीस्नानासाठी प्रयागराजला

Amravati News : हर्षे कुटुंब हे ३० जानेवारीला प्रयागराजच्या कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांचे घर मागील सहा- सात दिवसांपासून बंद होते. याची संधी साधत चोरट्यांनी चोरीचा प्लँन करत घरात दरोडा टाकला

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती महापालिकेतील माजी नगरसेविकेच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी तब्बल २२७ ग्रम सोन्याच्या दागिन्यासह एक लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. कुटुंब शाहीस्नान करण्यासाठी कुंभमेळ्याला गेले असताना घरात चोरी झाली आहे. दरम्यान चोरी करणारे तिन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. 

अमरावती शहरातील नमुना परिसरात माजी नगरसेविका लविना हर्षे यांच्या घरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान हर्षे कुटुंब हे ३० जानेवारीला प्रयागराजच्या कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांचे घर मागील सहा- सात दिवसांपासून बंद होते. याची संधी साधत चोरट्यांनी चोरीचा प्लँन करत घरात दरोडा टाकला आहे. हर्षे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोंडा तोंडात चोरटयांनी आतमध्ये प्रवेश केला. 

चोरट्यांचा शोध सुरु 

दरवाजाचा कडीकोंडा तुटल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. दरम्यान हर्षे कुटुंब अद्यापही प्रयागराजला कुंभमेळातच आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक घरी आले असता घरात जाऊन बघितले असता चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. घटनेबाबत माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येत पंचनामा केला. तर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चोरट्यांचा शोध अमरावती शहर पोलीस घेत आहे. तीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. 

१० लाखांचा मुद्देमाल लांबविला 

दरम्यान चोरट्यानी घरामध्ये प्रवेश करत कपाटात लॉक तोडून यातील सामान फेकून दिले. तसेच कपाटात ठेवलेले २२७ ग्रम सोन्याचे दागिने व एक लाख रुपये असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT