Bacchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu: मला अटक करण्याचा प्लॅन आखला जातोय, बच्चू कडू यांचा आरोप

Amravati Science Core Ground: 'परवानगी आम्हाला, मग सभा अमित शहा यांची कशी?', असा सवाल करत त्यांनी मैदनाच्या गेटवरच ठिय्या मांडला. यावेळी बच्चू कडू यांनी 'मला अटक करण्याचा प्लॅन आखला जातोय.', असा आरोप सरकारवर केला आहे.

Priya More

अमरावतीमध्ये आज प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सभेसाठी सायन्स कोर मैदानाच्या (Science Core Ground) परवानगीवरून बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेत. 'परवानगी आम्हाला, मग सभा अमित शहा यांची कशी?', असा सवाल करत त्यांनी मैदनाच्या गेटवरच ठिय्या मांडला. यावेळी बच्चू कडू यांनी 'मला अटक करण्याचा प्लॅन आखला जातोय.', असा आरोप सरकारवर केला आहे.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'या मैदानाची परवानगी आम्हाला मिळाली आहे. मैदानासाठी ५ तारखेला अर्ज केला होता. आम्ही १८ तारखेला पैसे भरले होते. याची कागदपत्रे आणि पावती आमच्याकडे आहेत. २३ आणि २४ तारखेसाठी परवानगी देण्यात आली होती. परवानगी असतानाही मैदान सोडण्यासाठी दबाब केला जात आहे. पोलिस आम्हाला मारायची भाषा करत आहेत.', असा आरोप त्यांनी केला.

तसंच, 'परवानगी असताना आम्हाला का रोखलं?', असा सवाल बच्चू कडू यांनी केले आहे. 'आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही. आता समोर आलो तर पोलिस आम्हाला आडवत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि पुन्हा करणार आहे. परवानगी असताना कोण कायदाभंग करत आहे. न्यायालयावर आम्हाला विश्वास राहिला नाही. आमची परवानगी असताना ती डावलली जात आहे. मला अटक करण्याचा प्लॅन आखला जात आहे.' असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

, उद्या १ लाख लोकं आणून इथेच आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 'रितसर परवानगी असताना आम्हाला का आडवलं गेलं. परवानगी असताना सभा रद्द का करायची?'असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 'पोलिस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत असे म्हणत अमित शहांनी कायदा तोडायला सांगितला का?', असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना केला आहे. त्याचसोबत कायद्यापेक्षा माणसं मोठी नाहीत, असे म्हणत परवानगी आम्हाला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Pune: पुण्यात खाकीवर डाग! २ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी PSI ताब्यात, गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतले पैसे

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

SCROLL FOR NEXT