Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : नकली दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड; अमरावतीमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात नकली देशी दारू बनविण्याचा कारखाना सुरु होता. या ठिकाणी नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून लाखो रुपयाची देशी दारू विकणाऱ्यावर अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देशी दारू बनविण्याचे काम सुरु असताना पोलिसांनी येथे धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अमरावतीच्या (Amravati) जुनी एमआयडीसी परिसरात हर्ष सपकाळ नावाच्या गृहस्थाने जागा भाड्याने घेऊन नकली देशी बॉबी दारू बनवण्याचा गोरख धंदा गेल्या पाच महिन्यापासून सुरू केला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर (Police) पोलिसांनी येथे गुरुवारी रात्री धाड टाकत अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाने कारखाना उध्वस्त केला. यामध्ये लाखो रुपयांचा नकली देशी दारू, केमिकलचा माल सुद्धा जप्त केला आहे. 

हर्ष सपकाळ हा मुंबईवरून केमिकल विकत आणून अहमदनगर कोपरगाव येथील कंपनीच्या नावाने बॉबी ९० मिली बॉटलवर नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती दारू विकत होता. पोलिसांना माहिती (Amravati Police) मिळताच त्यांनी या गोरख धंद्यावर छापा टाकून तेथून लाखो लिटर केमिकल, प्रिंटिंग मशीन व दारूच्या रिकाम्या बॉटल जप्त केले आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT