Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Ram Mandir Inauguration : अमरावतीत ११ लाख लाडूचा एक लाडू; हनुमान गढीवर होणार हनुमान पठण व प्रसाद वाटप

Amravati News : ११ लाख लाडूंचा एकच लाडू तयार केला जाणार आहे. यावेळी कार सेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: श्री रामजन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर (Amravati) अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा यांच्यावतीने ११ लाख लाडूचा एक लाडू तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. तर या लाडूचा प्रसाद देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात आहेत. यानुसार खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा (Ravi Rana) हे अनोखा उपक्रम राबवित आहेत. येथे ११ लाख लाडूंचा एकच लाडू तयार केला जाणार आहे. यावेळी कार सेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हजारो दिवे लावणार 

तसेच या ठिकाणी (Hanuman Chalisa) हनुमान चालीसा पठण करून हजारो दिवे लावून या ठिकाणी दिवाळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या ६ दिवसापासून ११ लाख लाडूचा एक लाडू तयार करण्याच काम सुरू आहे. याचा आढावा आमदार रवी राणा यांनी घेतला; तर उद्या सकाळी १० वाजता अमरावतीच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन रवी राणा यांनी केलं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT