Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv

Jalgaon Crime : ९ लाखाचा सुवर्ण दागिना घेऊन बंगाली कारागीर पसार; सराफ व्यावसायिकाची फसवणूक

Jalgaon News : जळगाव शहरात वास्तव्यास त्याच्या राहण्याच्या ठिकाणी शोध घेतला गेला. पण तो थेट पश्चिम बंगालला पळून गेल्याचा संशय आहे. सुभाशीष
Published on

जळगाव : जळगाव शहरातील काजल ज्वेलर्स या सराफा व्यापाऱ्याकडून १६२. १३७ ग्रॅम वजनाची सुमारे ९ लाख रुपये किमतीची (Jalgaon) सोन्याची लगड कारागिराने डाय पाडण्याच्या बहाण्याने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी (Police) पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Jalgaon Crime
Shirpur News : अकरा लाखांचा गुटखा भरलेला ट्रक पकडला; शिरपूर पोलिसांची कारवाई

रतन तारपदा मांझी (चोक चायपाट ,ता. दिसपूर,जिल्हा मिदनापूर पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. जळगाव शहरातील बदाम गल्लीतील सराफ व्यावसायिक सुभाशीष पंचानंद धारा (वय ३३) यांचे काजल ज्वेलर्स नावाने सराफी पेढी आहे. ते व्यावसायिकांकडचे सोने घेउन विविध दागिन्यांसाठी डाय पाडण्याचा व्यवसाय आहे. अशाच प्रकारे धारा यांच्याकडील बंगाली कारागीर रतन मांझी याला डाय पाडण्यासाठी ९ लाखाची १६२. ३७ ग्राम वजनाची (Gold) सोन्याची लगड दिली असता, तो पसार झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Crime
Aditya Thackeray News : राज्यावर मोठा अन्याय होत असल्याने प्रत्येक निवडणूक महत्वाची; आदित्य ठाकरे

जळगाव शहरात वास्तव्यास त्याच्या राहण्याच्या ठिकाणी शोध घेतला गेला. पण तो थेट पश्चिम बंगालला पळून गेल्याचा संशय आहे. सुभाशीष धारा यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास करत फरार झालेल्या कारागिरांचा शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com