Navneet Rana Amravati News Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana: राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदान्या? आदिवासी महिलांनी व्यक्त केला संताप, पाहा VIDEO

Amravati Breaking News: राणा दाम्पत्यांनी वाटप केलेल्या साड्या आहेत की मच्छरदान्या, असा प्रश्न आदिवासी महिलांना पडला आहे. साड्यांचे वाटप करायचे होते, ते चांगल्या साड्या द्यायचा, असंही महिलांनी म्हटलं आहे

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

Navneet Rana Amravati News

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने होळीच्या सणापूर्वीच राणा दाम्पत्याने मेळघाट येथील आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र, यासाड्या आहेत की मच्छरदान्या, असा प्रश्न आदिवासी महिलांना पडला आहे. साड्यांचे वाटप करायचे होते, ते चांगल्या साड्या द्यायचा, असंही महिलांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाही, असा संताप देखील आदिवासी महिलांनी व्यक्त केला आहे. या साड्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांनी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत मेळघाट परिसरातील काही आदिवासी महिला दिसून येत आहेत. त्यांच्या हातात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Mla Ravi Rana) यांचे फोटो असलेली बॅग दिसून येत आहे. सोबतच महिलांच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देखील आहेत. या साड्यांचा वापर घालण्यासाठी करावा, की मच्छरदानी म्हणून तिचा वापर करावा, असा प्रश्न महिला विचारत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर अशा साड्या वाटप करून तुम्ही आमची थट्टा लावली आहे का? असा सवाल देखील काही महिलांनी उपस्थित केलाय. दरम्यान, २०१९ साली अमरावतीतून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या खासदार रवी राणा यंदा भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या निकालावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT