Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : अमरावतीची जागा कमी झाली तरी चालेल; आमदार रवी राणांचा संजय खोडके यांना खोचक टोला

Amvaravati News : अमरावतीमध्ये २००९ पासून जिल्ह्यात खोडके विरुद्ध राणा हा वाद पाहायला मिळत असून आता हा वाद विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक उमेदवार व पक्ष आपल्या जागा वाढण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान विधानसभेत अमरावतीची जागा कमी झाली तरी चालेल; पण जिल्हाभर कमळ फुलल पाहिजे; असा खोचक टोला आमदार रवी राणा यांनी संजय खोडके यांना लगावला आहे. राणांच्या या वक्तव्याने महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अमरावतीमध्ये (Amravati News) २००९ पासून जिल्ह्यात खोडके विरुद्ध राणा हा वाद पाहायला मिळत असून आता हा वाद विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सध्या खोडके आणि राणा हे दोघेही महायुतीचे घटक असून महायुतीमध्ये निवडणुकीत एकत्र निवडणूक लढत आहे. मात्र खोडके विषयी (Ravi Rana) रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान रवी राणा यांनी म्हटले आहे, कि जिल्ह्यातील कमळाच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. एखादी अमरावतीची जागा निवडून नाही आली तरी चालेल; परंतु जिल्ह्यात कमळ फुलले पाहिजे; असं म्हणत रवी राणा यांनी खोडके यांना पुन्हा डीचवला आहे. त्यामुळे रवी राणा महायुती धर्म पाडणार नसल्याचे बोलले जात आहे. रवी राणा यांनी भाजप कार्यालयात हे वक्तव्य केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT