Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Earthquake : अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; मेळघाटात कोसळली दरड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण VIDEO

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजगाव सुर्जी तालुक्यातील अनेक भागात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवून आले. घरातील वस्तू हलू लागल्याने नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी लागलीच घराबाहेर धाव घेतली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य प्रकारचे धक्के लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिक घराच्या बाहेर निघाले. (Earthquake) कोणाच्या घरावर आवाज झाला. घरावरील टीनावर सुद्धा आवाज झाला. दरम्यान चिखलदरा, धारणी परिसरात या एकच चर्चेला उधाण आले होते. सर्वांनी एकमेकांना फोन लावून विचारणा करत विचारपूस केली. 

भूकंपामुळे बसवर कोसळली दरड 

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा शहरासह तालुक्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवून आले. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चूर्णी, पाचडोंगरी, जरीदासह आणखी काही गावात भूकंपाचे धक्के बसले असून संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. तर येथे आलेले पर्यटकही भीतीच्या छायेत आहेत. त्याचप्रमाणे मेळघाटात भूकंपाच्या धक्क्याने भूस्खलन झाले असून पहाडाची दरड एसटी बसवर कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र यात काही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

कोणत्याही प्रकारची हानी नाही 

दरम्यान अमरावती जिल्ह्यात जमविलेल्या भूकंपाचा धक्का हा सौम्य असल्याने यामुळे कुठल्याही प्रकारची वित्त किंवा जीवित हानी झालेली नाही. दरम्यान चिखलदरा, धारणी, परतवाडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्या झटके जाणवले असल्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatlh Tips: सांधेदुखीने त्रस्त आहात? घरीच करा हे ५ उपाय, झटक्यात मिळेल आराम

Sunita Williams : सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर पोहोचणार; नासाने काय केली तयारी? पाहा व्हिडिओ

Share Market: तयार राहा! पैसे कमावण्याची जबरदस्त संधी, पुढच्या महिन्यात निघतोय 'या' मोठ्या कंपन्यांचा IPO

BRS Party : महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

Laxman Hake viral video : लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप; पुण्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT