Amravati Latest News Saamtv
महाराष्ट्र

Amravati News: पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; संतप्त शिवसैनिकांकडून कंपनी कार्यालयाची तोडफोड

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी

Amravati Breaking News:

दिवाळी सुरू झाली असतानाही अद्यापही पीक विमा नुकसान भरपाईची २५ टक्के रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून विरोधीपक्ष याविरोधात आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी पीकविमा कंपनीसमोर आंदोलन सुरू आहेत. अमरावतीमध्येही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली.

अमरावतीत (Amravati) अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे वरुड येथील शिवसैनिक (ठाकरे गट) उमेश शहाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनीचे वरूड येथील कार्यालयाची तोडफोड केली. तसेच यावर ठोस पाऊले न उचलल्यास सर्व कार्यालये फोडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

वारंवार पाठ पुरावा करून ही आणि सगळीच माहिती सरकार दरबारी आणि इंशुरन्स कंपनीला पोहचली असूनही जाणून बुजून सरकार आणि इंशुरन्स कंपनी शेतकर्यांची दिवाळी अंधारात जात आहे. संत्रा, मोसंबी, कापूस, तूर या सर्व पिकांचे नुकसान झाले असून विमा कंपनी आणि सरकार मोगलाई प्रमाणे वागत असल्याचा आरोप उमेश शहाणे यांनी केला आहे.

यावर तात्काळ निर्णय घ्या अन्यथा संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनीचे कार्यालय फोडून शेतकऱ्यांना न्याय देवू असा इशाराही शिवसेनेचे कार्यकर्ते उमेश शहाणे यांनी सांगितले. दरम्यान, कालही ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT