शिंदे गटाला पाठींबा देणारे अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांकडून जेवढा त्रास होत नाही, त्यापेक्षा जास्त त्रास हा भाजपकडून होत आहे, असं बच्चू कडून यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर बच्चू कडू यांनी भाजपला इशारा देखील दिला आहे. (Latest Marathi News)
भाजपने आमच्या विरोधात फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, फक्त कामापुरतं वापरायचं आणि फेकून द्यायचं असले धंदे भाजपने आमच्यासोबत करू नये, त्यांना ते परवडणार नाही, असा कडक इशाराही आमदार बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे. ते मंगळवारी अमरावती (Amravati News) येथे बोलत होते.
अमरावती येथे बोलताना भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. भाजपकडून होणाऱ्या या त्रासाची आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ठणकावून सांगितलं आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी भाजपनं आणखी दोन आमदार, तीन खासदार लावावेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
भाजपनं मैत्री करताना आणि मित्रत्व निभावतांना ते सर्वच प्रकारे निभवावं. फक्त कामापुरतं वापरून फेकून द्यावं, असं करू नये असंही बच्चू कडू यांनी म्हटले. भाजपनं आपल्याच सोबत राहणाऱ्यांची फील्डिंग लावायचे धंदे बंद करावेत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे सरकारवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं. मात्र, शिंदे गटासोबत जाऊन भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर बच्चू कडू यांच्या पदरी निराशाच आली.
दिव्यांग मंत्रालय देऊन बच्चू कडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अजूनही बच्चू कडू हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून त्यांनी अमरावतीत बोलताना हे विधान केलं आहे. बच्चू कडू यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.