Bogus Cotton Seeds Saam tv
महाराष्ट्र

Bogus Cotton Seeds : ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे तस्करी; अमरावतीत कारवाई, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Amravati News : राज्यात काही बियाणे प्रतिबंधीत असताना देखील त्याची चोरून तस्करी करत विक्री करण्यात येत असते. या अनुषंगाने कृषी विभाग सजग असून प्रतिबंधित कापूस बियाणे विरोधात कारवाई करत आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असल्याने कापूस बियाण्यांची खरेदीची लगबग सुरु झाली आहे. अशात प्रतिबंधित कापूस बियाणे देखील विक्रीसाठी आणले जात आहेत. अशात अमरावतीत ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित एचटी बीटी कपाशी बियाण्याची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधून हे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे येत होते. मात्र कृषी विभागाने कारवाई करत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

राज्यात अवकाळी पावसानंतर अनेक भागात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे शेती मशागत करून पेरणीसाठीच्या तयारीला शेतकरी लागला आहे. बाजारात देखील कापूस, मका, सोयाबीनची बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान राज्यात काही बियाणे प्रतिबंधीत असताना देखील त्याची चोरून तस्करी करत विक्री करण्यात येत असते. या अनुषंगाने कृषी विभाग सजग असून प्रतिबंधित कापूस बियाणे विरोधात कारवाई करत आहे. 

अहमदाबादमधून बियाणे तस्करी 

खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉईट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये प्रतिबंधित असलेली एचटीबीटी कपाशी बियाण्याची तस्करी होत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली असून सर्व बियाणांचे पाकीट जप्त केले आहेत. 

२५ लाख रुपयांचा माल जप्त 

दरम्यान कृषी विभागाने कारवाई दरम्यान तपासणी करत ट्रॅव्हल्समध्ये शासन मान्यता नसलेले अनधिकृत एचटीबीटी बियाण्याचा एकूण ५० पांढरे कट्टे प्रति कट्ट्यात ५० पाकीट प्रमाणे २५०० पाकिटे व प्रिंटिंग केलेले चार कट्टे जप्त केले आहेत. ज्याची अंदाजीत रक्कम २५ लाख रुपयांच्या वर आहे. हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र कृषी विभागाने केलेली हि कारवाई राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Ashok Kharat Case: कोडवर्डवाले २५०० नंबर; अशोक खरातच्या मोबाइलमधील मायाजाल पाहून पोलीसही चक्रावले

मोठी दुर्घटना! कराडमध्ये केमिकल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट अन् अग्नितांडव, पाहा व्हिडिओ

Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

SCROLL FOR NEXT