Bogus Cotton Seeds Saam tv
महाराष्ट्र

Bogus Cotton Seeds : प्रतिबंधित बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट; पश्चिम विदर्भात १२ ठिकाणी कारवाई

Amravati News : काही ठिकाणी प्रतिबंधीत असलेल्या एचटीबीटी कापसाचे बोगस बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने पश्चिम विदर्भात मोठी कारवाई केली

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. यातच प्रतिबंधित असलेल्या बोगस बियाणे विक्रीचा देखील सुळसुळाट पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात एचटीबीटी प्रतिबंधित असलेल्या बोगस कपाशी बियाणांचा मोठा साठा आढळून आला आहे. गेल्या तीन आठवड्यांत विविध पथकांनी १२ ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात आली आहे. तर यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांकडून खरेदीला देखील सुरवात करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी प्रतिबंधीत असलेल्या एचटीबीटी कापसाचे बोगस बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने पश्चिम विदर्भात मोठी कारवाई केली जात आहे. 

६२ लाखाचे बोगस बियाणे जप्त 

मागील तीन आठवड्यात १२ ठिकाणी छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणाहून तब्बल ४ हजार ४२९ बियाणांची पाकिटे व ८०० किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले आहे. त्यांची एकूण किंमत ६२ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवले आहेत. या बोगस बियाणांचे धागेदोरे गुजरात व प्रामुख्याने अहमदाबाद परिसराशी जुळलेले आहेत. 

मुख्य सूत्रधाराच्या शोध घेण्याची मागणी 

दरम्यान गुजरात राज्यातून बोगस बियाणे येतं त्यामुळे त्याच्या पाठीमागे कोण आहे? गुन्हे दाखल होतो, मात्र त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? खऱ्या पोलिसांपर्यंत पोलीस का पोहोचत नाही? पोलिसांनी याचा आका शोधणे गरजेचे आहे. कारण ही बियाण्याची कंपनी गुजरातच्या कोण्या बड्या नेत्याची आहे का? असा सवाल अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्र लिहिले आहे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या गुजरातच्या कंपनीवर कडक कारवाई करा अमरावती पोलिसांनी गुजरात मध्ये जाऊन  याचा तपास करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT