Dhule ACB : जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ३० हजाराची लाच; पंटर एसीबीच्या ताब्यात

Dhule News : घरातील दोन जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप जात प्रमाणपत्र मिळाले नव्हते. यामुळे तक्रारदाराने अधिकाऱ्यांला विचारणा करण्यासाठी कार्यालय गाठले
Dhule ACB
Dhule ACBSaam tv
Published On

धुळे : सध्या दाखले, जात प्रमाणपत्र काढून घेण्याची लगबग पाहण्यास मिळत आहे. दरम्यान जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला असताना अधिकारी सुटीवर होता. यामुळे जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या पंटरला धुळ्याच्या लाच लुचुकत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. यामुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. 

धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. सदर प्रकरणात तक्रारदाराने घरातील दोन जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. अर्ज करण्यास सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप जात प्रमाणपत्र मिळाले नव्हते. यामुळे संबंधित तक्रारदाराने अधिकाऱ्यांला याबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालय गाठले. मात्र संबंधित अधिकारी त्या ठिकाणी मिळून आले नाही.  

Dhule ACB
Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात

अधिकारी नसल्याने पंटरने साधली संधी 

तक्रादाराला येथे असलेल्या जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी असलेल्या पेंटरने गाठले. त्याने आपण जात प्रमाणपत्र काढून देऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी आपले चांगले आहे; अशी बतावणी केली. याकरिता तक्रादाराकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र जात प्रमाणपत्र काढण्यासाठी इतकी मोठी रक्कम देता येणे शक्य नसल्याने संबंधित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली.  

Dhule ACB
Farmer Relief Fund Scam : अतिवृष्टी अनुदानात १८ कोटी रुपयांचा घोटाळा; गाव तपासणींसाठी १५ दिवसांची मुदत

सापळा रचून रंगेहात पकडले 

दरम्यान तक्रारीची पडताळणी केल्यानंतर धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. यानंतर संबंधित पंटरने लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रुचून रंगेहात ताब्यात घेतले आहे, या संदर्भात लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com