पुणे : एटीएम मशीनमधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांकडील कार्ड बदलून त्यांचा पिन नंबर जाणून घेत. तसेच त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेणार्या दोघा आंतरराज्य गुन्हेगारांच्या खडकी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे चोरीसाठी गाजियाबाद येथून विमानाने प्रवास करत येत होते. दरम्यान पुण्यात त्यांनी आणखीही अनेक ठिकाणी एटीएम कार्डची आदलाबदली करुन नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी सावेज सलीम अली (वय ३०, रा. लोणी गाजियाबाद, उत्तर प्रदेश) व नियाज इजाज मोहम्मद (वय २९, रा. लोणी गाजियाबाद) अशी या चोरट्यांची नावे आहेत. दरम्यान खडकी येथील एका एटीएममधून पैसे काढण्यासाठी संजय गोपीनाथ कदम (वय ६३) हे ९ मे रोजी गेले होते. त्यांना एटीएम मशीनवरुन पैसे काढत असताना त्यांचा पिन चोरट्यांनी पाहिला व त्यांना एटीएम मशीनवरुन पैसे काढत असताना पैसे काढून देतो, असे सांगून एटीएम कार्डची मागणी केली.
कार्ड घेऊन चोरटे झाले पसार
कदम यांनी नकार दिल्यावर आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्याकडील कार्ड घेऊन ते पळून गेले. दुसर्या विविध ठिकाणावरुन त्यांनी त्यांच्या खात्यातील १ लाख ४ हजार ६५० रुपये काढून घेतले होते. याबाबत कदम यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खडकीतील गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. तसेच कदम हे सुरक्षा रक्षक म्हणून तुटपुंजा पगारावर उदरनिर्वाह चालवतात. त्यांची आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी लांबविली होती.
पोलिसांनी छापा टाकत लॉजवरून घेतले ताब्यात
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी गुन्हे शोध पथक प्रमुखाकडे दिला होता. पोलिसांची विविध पथके तयार करुन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती उपलब्ध करुन शोध सुरु केला. त्यात पोलीस अंमलदार प्रताप केदारी यांना बातमीदारामार्फत चोरटे उत्तर प्रदेशातील असून विविध शहरात फिरतात. सध्या नाना पेठेतील एका लॉजमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. लॉजमध्ये असल्याची खात्री होताच पथकाने छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ६९ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.