Adulteration in Milk Saam tv
महाराष्ट्र

Adulteration in Milk: दुधाच्या कॅनमध्ये पॅकिंग पिशवीतील दूध टाकून घरोघरी वाटप; धक्कादायक प्रकार आला समोर

Amravati News : पॉकेटचे दूध आपल्या कॅनमध्ये टाकतानाचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाला

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : पॅकिंगच्या दुधाऐवजी ताजे व घरगुती दूध घेणे अनेकजण पसंत करत असतात. याकरिता ग्रामीण भागातील (Milk) दूध विक्रेत्याकडून रोज दूध घेत असतात. परंतु या ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार (Amravati) अमरावती शहरात समोर आला आहे. यात दुधाच्या कॅनमध्ये पॅकिंग पिशवीतील दूध टाकले जात आहे. (Live Marathi News)

अनेक ठिकाणी दुधामध्ये भेसळ होताना पाहायला मिळत असताना आपल्या लहान मुलांसाठी शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागातून येणाऱ्या किंवा आपल्या परिसरातील गाई- म्हशी पालन करणाऱ्या लोकांकडून महागड्या दरात दूध नागरिक खरेदी करतात. मात्र अमरावती लगतच्या वलगावमध्ये दूध विक्री करणारा तरुण चक्क डेअरीमधील पॉकेटचे दूध आपल्या कॅनमध्ये टाकतानाचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्राहकांनी विश्वास ठेवावा कसा 

पावडर टाकून दुधात भेसळ केली जात असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. परंतु ताजे दूध घेण्याच्या उद्देशाने जे ग्राहक महागड्या दरात दूध घेत असतात. परंतु विक्रेते अशा प्रकारे विक्री करून नागरिकांची लूट सुद्धा होताना दिसून येत आहे. यामुळे आता ग्राहकांनी विश्वास कसा ठेवावा हे पाहणे महत्वाचे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lunar Eclipse: वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी? यावेळी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या.

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT