Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : बस थांबविली नाही म्हणून चालकाला लोखंडी पाईपने मारहाण; दर्यापूर- अमरावती मार्गावरील घटना

Amravati News : बस घेऊन जात असताना खोलापुर फाट्याच्या इस्तेमा सुरू होता. त्या ठिकाणी १० ते १५ लोकांनी बस थांबवण्यास सागितले

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अकोटवरून नागपूरला जाणारी बस चालकाने खोलापुर फाट्याजवळ थांबवली नाही. याचा राग आल्याने (St Bus) बसचा पाठलाग करून चालकावर लोखंडी पाईपने हल्ला केला. (Amravati) यात बस चालक गंभीर जखमी झालेला आहे. (Latest Marathi News)

राज्य परिवहन महामंडळाच्या अकोट आगाराची बस आकोटवरून नागपूरकडे मार्गस्थ झाली होती. या (MSRTC) बसवर अमोल गावंडे हे चालक होते. बस घेऊन जात असताना खोलापुर फाट्याच्या इस्तेमा सुरू होता. त्या ठिकाणी १० ते १५ लोकांनी बस थांबवण्यास सागितले. मात्र त्या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे चालकाने बस न थांबवता पुढे नेली. मात्र दोन ते तीन अज्ञात इसमानी बसचा पाठलाग करून बस अडविली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाद घालत केला हल्ला 

चालकासोबत बस का थांबवली नाही म्हणून बाचाबाची सुरू केली. या दरम्यान त्यातीलच एकाने मागून येऊन बस चालकावर पाईपाने अचानक वार केला. यात चालकाच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली आहे. यावेळी घटनास्थळी खोलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर बस पोलिसांनी ठाण्यात नेल्यानंतर चालकाच्या फिर्यादनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT