Ravi rana  Saam Tv
महाराष्ट्र

Ravi Rana News: आमदार रवी राणा वादाच्या भोवऱ्यात! मनपा कर्मचाऱ्याला सफाईसाठी नाल्यात उतरवलं; भाजप आक्रमक

Amravati Latest News: गेल्या तीन वर्षांपासून अमरावती महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने कंत्राटदारांच स्वच्छतेवर व साफसफाईवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळेअमरावती शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झाले होते.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. १६ ऑगस्ट २०२४

बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा एका कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आमदार रवी राणा यांनी मनपा कर्मचाऱ्याला नाल्यात उतरवुन सफाई काम करायला लावल्याने नवा वाद उभा राहिला आहे. रवी राणा यांनी केलेले हे कृत्य अमानवी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते तुषार भारतीय यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी मनपा कर्मचाऱ्याला चक्क नालीत उतरवून सफाई करायला लावल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा भाजप नेते तुषार भारतीय यांनी हे अमानवी असून रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अमरावती महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने कंत्राटदारांचे स्वच्छतेवर व साफसफाईवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अमरावती शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झाले होते. यावेळी रवी राणा यांनी चक्क संजय माहुलकर या मनपा कर्मचाऱ्यांला नालित उतरवून साफसफाई करायला लावली होती.

या साफसफाईच्या मुद्यावरून पुन्हा एकदा महायुतीत असलेला अंतर्गत वाद समोर आला आहे.महायुतीत घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या राणावर भाजपने त्यांना घरचा आहेर दिला असून आमदार रवी राणांवर मनपा आयुक्तांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे तुषार भारतीय यांनी केली आहे. तसेच निवडणूक जवळ आली त्यामुळे रवी राणाना नालेसफाई भूमिपूजन दिसते, जनता यांना माफ करणार नाही अशी टीकाही तुषार भारतीय यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT