Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा; ८ जूनपासून बच्चू कडू बसणार बेमुदत उपोषणाला

Amravati News : अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडत सरकारला अल्टिमेटम देखील दिला आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग यांच्या असलेल्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. या विरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडून यांनी आंदोलन पुकारले आहे. येत्या ८ जुनपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. गुरुकुंज मोझरी येथे कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार असल्याची माहिती बच्चू कडून यांनी बोलताना दिली आहे. 

राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विचारात नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसह दिव्यांग व विधवा महिलांचे मानधन आदी प्रश्न मांडण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे ८ जूनपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडत सरकारला अल्टिमेटम देखील दिला आहे. 

दरम्यान शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग व विधवा महिलांना ६ हजार रुपये मानधन द्या, मनरेगा वरील मजुरी ३१२ रुपये वरून ५०० रुपये करा, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे MREGS मध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांसोबत ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा. यासह विविध मागणीसाठी बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार आहे. सरकार जोपर्यंत या मागण्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली आहे.  

बाईक रॅली काढून होणार सुरवात 

दरम्यान अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी १५ ते २० हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोझरी येथे सभा घेऊन सभेचे रूपांतर अन्नत्याग आदोलनात होईल; अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यामुळे ८ तारखेपूर्वी बच्चू कडू यांच्या मागण्यावर सरकार विचार करणार का? याकडे लक्ष लागल आहे. कारण बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रहारचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT