Farmers End Life
Farmers End Life Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: बळीराजा थांब रे...! अमरावतीत ३ महिन्यात ८८ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलं; धक्कादायक आकडेवारी समोर

Rohini Gudaghe

अमर घटारे साम टीव्ही, अमरावती

अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दोन दशकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यंदाच्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये मागील तीन महिन्यांत ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या (Amravati Farmers) केल्याचं समोर आलं आहे. तर सर्वाधिक आत्महत्या मार्च महिन्यात झालेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

प्रशासन आणि राजकारण निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचं समोर आलं (Farmers End Life) आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. त्यातच अमरावती जिल्ह्यात दोन दशकातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झालेल्या आहेत.

यंदाच्या तीन महिन्यात तब्बल ८८ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. यापैकी फक्त एका शेतकऱ्याला शासन मदत देण्यात आलेली आहे. यामध्ये ८१ प्रकरणे अजूनही चौकशीसाठी (Farmers End Life In Amravati) प्रलंबित आहे. यंदा जानेवारी महिन्यात २४, फेब्रुवारी २८ तर मार्च महिन्यात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

परभणीतील घटना

मराठा आरक्षणासाठी देऊळगाव गात येथील तरुणाने १६ एप्रिल रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या तरूणाने शर्टने पळसाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपवल्याचं समोर आलं (End Life) होतं. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. ही घटना सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे लेंडी नदीच्या काठावर घडली होती. सदर प्रकरणी सेलू येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाबासाहेब सिताराम गायकवाड, असं आत्महत्या करणाऱ्या तरूणाचं नाव आहे. त्याचा मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT