अमर घटारे
अमरावती : राज्यभरात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होताना दिसू लागल्या आहेत. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील तब्बल ७७६ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात सर्वाधिक पाणी टंचाई मेळघाटमधील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात आहेत. यातही मेळघाट परिसरातील ३० गावांपर्यंत ट्रँकर पोहचू शकत नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राज्यात उन्हाची तीव्रता वाढण्यासोबत पाणीटंचाईच्या झळा देखील तीव्र होऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी मार्च महिन्यातच पाणी टंचाई जाणवत असून एप्रिलच्या मध्यंतरात पाणी टंचाई अधिक तीव्र जाणवू लागली आहे. अमरावती जिल्ह्यात ५६ पाणी प्रकल्प आहेत. यात ४६.२९ टक्के जलसाठा असून २८ प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे जिल्ह्यात पाण्याची भीषणता अधिक निर्माण झाली असून जिल्ह्यातील ७७६ गावांमध्ये टंचाई जाणवायला लागली आहे.
विहिरींवर तुफान गर्दी
मेळघाटमध्ये विहिरीने तळ गाठला आहे. तर सार्वजनिक नळावर मोठी गर्दी उसळली आहे. विहीरवर पाणी भरण्यासाठी तुफान अशी गर्दी दिसून येतं आहे. मेळघाटमध्ये पाण्याचे पूर्ण स्रोत आटले आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत असून मे महिन्यात आणखी परिस्थिती भीषण होते की काय? अशी भीती व्यक्त होतं आहे. धक्कादायक म्हणजे मेळघाट मधील ३० गावात टँकरही जाऊ शकतं नाही इतका रस्ता खराब आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ४७ विहिरीचे अधिग्रहण
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. यामुळे खाजगी विहिरी अधिग्रहणाचा आकडा ६८ वर पोहोचला असून अवघ्या आठ दिवसात प्रशासनाच्या नोंदी ४७ खाजगी विहिरी अधिग्रहीत झाल्या आहेत. यावरून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर जिल्ह्यातील १२ गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. येत्या काही दिवसात यात मोठ्या संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.