Bullock Cart Race : बैलगाडा चालकांना शर्यतीत हेल्मेट सक्ती; अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kalyan News : बैलगाडा हाकताना अनेकदा अपघात होऊन यात बैलगाडा चालक जखमी होऊन दुर्घटना घडत असतात. याच अनुषंगाने बैलगाडा चालकांची सुरक्षा लक्षात घेता संघटनेकडून महत्त्वपूर्ण निर्माण घेण्यात आला
Bullock Cart Race
Bullock Cart RaceSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: राज्यभरात अनेक भागांमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यास मिळत असतो. मात्र बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात होऊन बैलगाडा चालकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शर्यतीत सहभाग घेणाऱ्या बैलगाडा चालकांना आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील अनेक भागांमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केल्या जात असतात. यामध्ये राज्यभरातून बैलगाडा चालक सहभागी होत स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र बैलगाडा हाकताना अनेकदा अपघात होऊन यात बैलगाडा चालक जखमी होऊन दुर्घटना घडत असतात. याच अनुषंगाने बैलगाडा चालकांची सुरक्षा लक्षात घेता संघटनेकडून महत्त्वपूर्ण निर्माण घेण्यात आला आहे. 

Bullock Cart Race
Walmik Karad: वाल्मिक कराड जेलमध्ये, बाहेर चेल्याची दहशत; पोलिस अधिकऱ्याच्या जबाबाने बीडमध्ये खळबळ

तर त्या बैलगाडा चालकांना शर्यतीत बंदी 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात बैलगाडा चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेक बैलगाडा चालकांकडून संघटनेच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून बैलगाडा हाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आता संघटनेने कठोर निर्णय घेत हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांना शर्यतीत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली. 

Bullock Cart Race
Mumbai Crime : अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या परराज्य टोळीचा पर्दाफाश; १० कोटी रूपये किमंतीचे चरस जप्त

चालकांचा विमा देखील काढणार 

बैलगाडा चालकांना संघटनेमार्फत हेल्मेट दिले जात आहे. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व शर्यतीला काही गालबोट लागू नये. यासाठी बैलगाडा चालकांनी हेल्मेट वापरावे; असे आवाहन देखील माळी यांनी केला आहे. तसेच बैलगाडा चालकांच्या सुरक्षिततेसाठी बैलगाडा मालक आणि संघटनामार्फत या चालकांचा विमा देखील काढण्याचे नियोजन केले असल्याची माहिती माळी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com