Amravati Nagpur Highway Accident
Amravati Nagpur Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Accident News: अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कॉलेजला निघालेल्या तरुणीला ट्रकने स्कूटीसकट फरफटत नेलं

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Nagpur Highway Accident: अमरावती-नागपूर महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कॉलेजला निघालेल्या तरुणीच्या स्कुटीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने स्कूटीला २० ते २५ फूट फरफटत नेलं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ट्रकने धडक दिल्यानंतर स्कूटीवरून दूर फेकल्या गेल्याने तरुणीचा जीव वाचला आहे. मात्र, या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन करत तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त तरुणी ही स्कूटीवरून कॉलेजला निघाली होती. अमरावती-नागपूर महामार्गावरील हॉटेल गौरी इन जवळ ती आली असता, समोर नागपूर वरून येणाऱ्या एका ट्रकने तिच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी बाजूला फेकली गेली. त्यानंतर ट्रकचालकाने स्कूटीला तब्बल २० ते २५ फूट दूर फरफटत नेले. (Breaking Marathi News)

या भीषण अपघातात (Accident) स्कुटीला चेंदामेंदा झाला. मात्र,बाजूला फेकल्या गेल्याने तरुणीचा जीव वाचला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन करत तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बारामतीत कारची बसला धडक ८ जण जखमी

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक लोणी देवकर गावच्या हद्दीत एसटी बस आणि मारुती इको कारचा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आलं आहे.

लोणी देवकर या ठिकाणी तळेगाव डेपोची बस (Bus Accident) पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. याच दरम्यान पाठीमागून वेगात आलेल्या कारवरील चालकाने नियंत्रण सुटले आणि कार थेट बसला धडकली. या अपघातात ८ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local News : लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

Today's Marathi News Live : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Wooden Comb: केस विंचरण्यासाठी लाकडी की प्लास्टिकचा कंगवा वापरावा?

Eastern Express Highway : ईस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी, चाकरमान्यांना मनस्ताप

Kalyan News : सोशल मीडियावर 'गे' चिडवलं; जाब विचारायला गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT