Amravati  Saam tv
महाराष्ट्र

मतदानाच्या आधीच मोठी राजकीय घडामोड; अमरावतीत भाजप आणि रवी राणा यांच्या पक्षाची युती तुटली

amaravati Politics : मतदानाच्या आधीच मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अमरावतीत भाजप आणि रवी राणा यांची युती तुटली आहे.

Vishal Gangurde

अमरावतीत भाजप–रवी राणा युती तुटली

मतदानाच्या अगदी आधी मोठी राजकीय घडामोड घडलीये

युवा स्वाभिमान पक्षाला दिलेल्या ६ जागांवर भाजपचा अपक्षांना पाठिंबा दिलाय

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांची अधिकृत माहिती दिली

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती महापालिकेत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अमरावतीत भाजप आणि रवी राणांची युती तुटली आहे. युती तुटल्याने अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षाची युती तुटल्याची माहिती भाजपच्या डॉ. नितीन धांडे यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती महानगरपालिका निवडणुकीत युती झाली होती. मात्र आता मतदानाला काही दिवस शिल्लक असताना ही युती तोडण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने ज्या 6 जागा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला दिला होता.

स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिलेल्या 6 जागांवर भारतीय जनता पक्षाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिली आहे. भाजपच्या भूमिकेने अमरावतीचा राजकारणात खळबळ उडाली आहे.

औवेसींची रवी राणांवर टीका

खासदार असुद्दीन औवेसी यांनी महायुती आणि रवी राणांवर जोरदार टीका केली. औवेसी यांनी म्हटलं की, 'या निवडणुकीत आपल्या मतांचे विभाजन टाळा. सर्व समाजासाठी आपआपला नेता आहे. फक्त आपल्याकडे नेता नाही. आपण फक्त मतदान करतो, नेते आपण घडवत नाही. आपण फक्त मतदार राहाल तर आपले मुले जेलमध्ये राहतील. काँगेसचे लोक जिथ जिथे जातात, माझ्यावर टीका करतात. माझ्या पक्षावर टीका करतात. माझ्यावर आरोप करतात की भडकाऊ भाषण करतात. मोदींच्या नटाला ढिला करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup PAK vs SL Super 8: सामना जिंकूनही पाकिस्तान विश्वचषकात हरला; World Cupच्या स्पर्धेतून आऊट

Israel Strike on Iran: इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला; इराणची राजधानी तेहरान उद्धवस्त?

इराणवर अमेरीकेचा समुद्रातून वार; USS अब्राहम लिंकन युद्धनौका विध्वंस घडवणार?

Iran Vs US: अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर; अमेरिकेचे एअरबेस उद्ध्वस्त

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT