लंडनहून मुंबईत येताच संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

sangram patil news : लंडनहून मुंबईत येताच संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना ताब्यात का घेतलं, जाणून घ्या.
Sangram Patil
Mumbai News Saam tv
Published On
Summary

लंडनहून मुंबईत उतरताच संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात

प्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट करून दिली माहिती

संग्राम पाटील यांच्या चौकशीवरून वाद

संजय गडदे, साम टीव्ही

लंडनहून मुंबईत आगमन करताच संग्राम पाटील यांना विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे २ वाजल्यापासून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. ही कारवाई अन्यायकारक आणि छळवादी असल्याचे मत प्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

संग्राम पाटील हे लंडनमध्ये वास्तव्यास असतात. सोशल मीडियाावर परखड भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. पोलिसांकडून त्यांना चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन अटी-शर्तींसह सोडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये आणि राजकीय दबावाखाली पोलिसांचा गैरवापर होऊ नये, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे. असीम सरोदे यांनी ही माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

Sangram Patil
लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

संग्राम पाटील यांना ताब्यात घेताच काँग्रेस आक्रमक

संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध नोंदवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येताक्षणीच अटक केली याचा करावा तेवढा निषेध कमी आहे'.

Sangram Patil
कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

'सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना केलेली अटक ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. नेमकी काय कारणामुळे अटक केली याचा मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने खुलासा करावा. या दडपशाहीचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून धिक्कार करतो, असे सपकाळ यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com